इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या रोजगार व सेवाशर्तीचे नियमन करण्यासाठी व त्यांच्या सुरक्षा, आरोग्य व कल्याणासाठी उपाययोजना करण्याकरीता खालील अधिनियम / नियम केंद्र व राज्य शासनाने निर्गमित केले आहेत.
मंडळात नोंदणी करण्याकरीता फॉर्म – V भरुन खालील प्रमाणे दस्तऐवजासह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे…
नोंदणी फी – रू. 1/- व वार्षिक वर्गणी रू. 1/-
उपकराची तरतूद
इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण उपकर अधिनियम 1996 च्या कलम 3 (1) अनुसार केंद्र शासनाने अधिसूचना क्र. एसओ 2899, दिनांक 26 सप्टेंबर 1996 अन्वये बांधकामाच्या एकूण मुल्याच्या (जमिनीचे मुल्य वगळून) 1% दराने उपकर गोळा करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
या अनुषंगाने शासन उद्योग, उर्जा व कामगार विभाग, परिपत्रक क्रमांक बीसीए 2007/ प्र. क्र. 788/ कामगार 7-अ, दिनांक 26.10.2009, शासन निर्णय क्रमांक बीसीए 2009/ प्र. क्र. 108/ कामगार 7-अ, दिनांक 17.06.2010 व शासन निर्णय क्रमांक बीसीए 2009/ प्र. क्र. 108/ कामगार 7-अ, दिनांक 21.07.2011 अन्वये इमारत व इतर बांधकाम (रोजगार व सेवाशर्ती नियमन) अधिनियम, 1996 तसेच इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण उपकर अधिनियम 1996 अंतर्गत शासकीय कामावरील उपकर वसूल करावयाची कार्यपध्दती निश्चित करणेत आली आहे.
उपकराची रक्कम ही प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांच्या आत मंडळाच्या बँक खात्यात जमा करावयाची आहे.
उपकर कसा भरावा
उपकराची रक्कम ही सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बी. के. सी. शाखा, प्लॉट क्र. सी-6, ‘बी’ ब्लॉक, बांद्रे (पूर्व), मुंबई -400 051 या राष्ट्रीयकृत बँकेत मंडळाच्या चालू खाते (Current Account) 3671178591, आय.एफ.सी. (IFSC) कोड – CBIN0282611 मध्ये “महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई” (Maharashtra Building and other Construction Workers Wel fare Board, Mumbai) यांचे नांवे धनाकर्षाने/RTGS/NEFT ने बँकेत जमा करण्यात यावा. उपकराच्या रक्कमा धनादेशाने स्विकारल्या जाणार नाहीत. रक्कम जमा करण्याकरीता चलन नमुना व सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या विविध शाखांचा तपशील या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
उपकर न भरल्यास दंड
निर्धारित रकमेवरती दिलेल्या कालावधीत कलम ३ अंतर्गत नमूद केल्याप्रमाणे उपकराची रक्कम न भरल्यास, निर्धारित रकमेवर प्रती महिना २% दराने वसुली किंवा उपकराच्या रकमेइतका दंड आकारण्याची तरतूद आहे.
उपकर कोणाकडे भरावयाचा
इमारत व इतर बांधकामास परवानगी देणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय कार्यालये व शासकीय उपक्रम यांच्या प्राधिकृत अधिकाऱ्याकडे उपकर भरावा.
अ.क्र. | आस्थापना | उपकर वसुली अधिकारी | उपकर निर्धारण अधिकारी | अपिलीय अधिकारी |
---|---|---|---|---|
१ | शासकीय इमारत व इतर बांधकामाकरीता | उप अभियंता (सार्वजनिक बांधकाम) | कार्यकारी अभियंता (सार्वजनिक बांधकाम) | अधिक्षक अभियंता (सार्वजनिक बांधकाम) |
२ | सार्वजनिक उपक्रमाच्या इमारत व इतर बांधकामाकरीता | कार्यकारी अभियंता (संबंधित सार्वजनिक उपक्रम) | सहसंचालक / अतिरिक्त संचालक / महाव्यवस्थापक (संबंधित सार्वजनिक उपक्रम) | संचालक (संबंधित सार्वजनिक उपक्रम) |
३ | ज्या बांधकामास महापालिकेची मंजूरी आवश्यक आहे त्याकरीता | सहाय्यक महानगरपालिका आयुक्त / वॉर्ड ऑफिसर | महानगरपालिका उपआयुक्त | महानगरपालिका आयुक्त |
४ | ज्या बांधकामास नगर परिषदेची मंजूरी आवश्यक आहे त्याकरीता | कर निरीक्षक नगर परिषद | मुख्य अधिकारी नगर परिषद | नगर परिषद उपजिल्हाधिकारी क्षेत्राचे कार्यभार असलेले |
५ | ज्या बांधकामाकरीता ग्रामपंचायतीची मंजूरी आवश्यक आहे त्याकरीता | ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत | गटविकास अधिकारी पंचायत समिती | मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद |
६ | उपरोक्त अ. क्र. १ ते ५ मध्ये समाविष्ट नसलेल्या इमारत व इतर बांधकामाच्या मंजुरीकरिता | तहसीलदार | उपविभागीय अधिकारी | जिल्हाधिकारी |
महाराष्ट्राची आर्थिक पाहणी, २०१५-१६ मधील माहितीनुसार राज्यात १.०२ लाख बांधकाम आस्थापना अस्तित्वात आहेत.
इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) अधिनियम, १९९६ च्या कलम (७) अन्वये सदर अधिनियम लागू असलेल्या सर्व आस्थापनांनी नोंदणी करून घेणे अनिवार्य आहे.
मजुरांची संख्या | शुल्क |
---|---|
५० पर्यंत | रु. २५०/- |
५० पेक्षा अधिक पण १०० पेक्षा कमी | रु. ५००/- |
१०० पेक्षा अधिक पण ३०० पेक्षा कमी | रु. १०००/- |
३०० पेक्षा अधिक पण ५०० पेक्षा कमी | रु. २०००/- |
५०० पेक्षा अधिक | रु. २५००/- |